पुणे: महाराष्ट्रामध्ये गाळप हंगाम सुरु झाला आहे, आणि राज्यातही गाळपाची गती वाढत आहे. महाराष्ट्र साखर आयुक्तालयाच्या नवीन गाळप अहवालानुसार, साखर हंगाम 2019-2020 मध्ये, 11 डिसेंबर 2019 पर्यत, राज्यातील 110 साखर कारखान्यांनी (62 सहकारी कारखाने आणि 48 खाजगी कारखाने) ऊस गाळप सुरु केले आहे आणि 63.04 लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. 9.06 टक्क्याची रिकव्हरी दरासह 57.14 लाख क्विंटल साखर उत्पादन केले गेले आहे.
महाराष्ट्रात साखर कारखान्यांनी राज्याचे राज्यपाल बीएस कोश्यारी यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर अधिकृतपणे ऊस गाळप सुरु केले होते. राज्यापालांनी 22 नोव्हेंबर ला अधिकृतपणे हंगाम सुरु करण्यासाठी परवानगी दिली होती.
साखर हंगाम 2018-2019 मध्ये महाराष्ट्रात एकूण 195 साखर कारखान्यांनी गाळपात भाग घेतला होता आणि 951.79 लाख टन ऊसाचे गाळप करुन 11.26 टक्क्याच्या रिकव्हरी दराप्रमाणे 107.19 लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. या हंगामात, महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन कमी होण्याची संभावना आहे कारण, राज्यावर पूर आणि दुष्काळाचा परिणाम झाला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.