थकीत पगारासाठी उपोषण करणार्‍या साखर कामगाराचा मृत्यू

अहमदनगर : साखर कारखान्यातील कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी कारखाना प्रशासनाच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे. त्यात सहभागी असलेले सेवानिवृत्त कामगार सोपान पुंजाजी जगधने यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यावेळी इतर आंदोलकांनी त्यांना घरी पाठविले. त्यानंतर त्यांचे निधन झाले. मात्र, उपोषणामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा कामगारांनी केला असून प्रशासन दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

थकीत पगार व अन्य मागण्यांसाठी राहुरी येथील डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे उपोषण सुरू आहे. हा कारखाना सध्या खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे. ऊस टंचाईमुळे यावर्षी कारखाना बंद आहे. त्यातच कारखान्याने बँकेचे कर्ज थकविल्याचा आरोप जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व काही संचालकांनी केला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here