नवी दिल्ली : महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा (वय 64) हे आपले पद 1 एप्रिल 2020 मध्ये सोडणार आहेत. आणि बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत राहणार आहेत. म्हणजे पुढील काळात महिंद्रा मार्गदर्शकांची भूमिका बजावणार आहेत. कंपनीच्या गव्हनर्स, नॉमिनेशन ऍण्ड रिम्युनरेशन समितीच्या (जीएनआरसी) शिफारशीवरुन संचालक मंडळाकडून या बदलासाठी मान्यता दिली आहे.
संचालक मंडळाकडून अन्य बदलासही मान्यता दिली आहे. यामध्ये 1 एप्रिलपासून व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पवन कुमार गोयंका यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचा कार्यकाळ 11 नोव्हेंबर 2020 पर्यंत राहणार आहे. त्यानंतर 12 नोव्हेंबरपासून त्यांची 1 एप्रिल 2021 पर्यंत पुनर्नियुक्ती करण्यात येणार आहे.
आगामी 15 महिन्यात काही अधिकारी निवृत्त होणार आहेत.त्यामुळे शेअर बाजाराच्या रेग्युलेटर सेबीच्या नियमावलीनुसार स्ट्रक्चरिंग करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
आनंद महिंद्रा यांनी नेतृत्वामध्ये बदल करण्याची योजना तयार केली. त्याचा फायदा सध्या योग्य प्रकारे होत असून त्यांची ओळख चांगले प्रशासन राखणारे अध्यक्ष म्हणूनही करण्यात येत आहे.
दि. 1 एप्रिल 2020 पासून मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) म्हणून अनीष शहा हे आपले पद सांभाळणार आहेत. सध्याचे सीएफओ व्हीएस पार्थसारथी 1 एप्रिलपासून पद सोडणार आहेत. तर ते मोबिलिटी सर्व्हीस क्षेत्राचे प्रमुख होणार आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.