कोल्हापूर : जुलै-ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी 70:30 फॉर्म्युल्यानुसार पूरबाधित क्षेत्रातील ऊसाची तोडणी 15 जानेवारीपर्यंत संपवावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पूरबाधित क्षेत्रातील शेतीपंपाच्या वीज जोडणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठक़ीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
जिल्हाधिकारी देसाई यांनी साखर कारखानदार, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेवून तीन आठवड्यात टप्याटप्याने ऊसाची उचल करण्याचे आदेश दिले होते. कारखान्यांनी प्राधान्याने या ऊसाची उचल करण्याची ग्वाही दिली होती. हंगाम सुरु होवून महिना उलटला तरी केवळ 4307 हेक्टरवरील पूरबाधित ऊसाची उचल केली आहे. अद्याप 23 हजार 429 हेक्टरवरील ऊस शिवारात उभा आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी देसाई यांनी आढावा बैठक घेवून कारखनादारांना स्पष्ट शद्बात सूचना दिल्या आहेत. सर्वाधिक पूरबाधित क्षेत्र दत्त शिरोळ कारखान्याचे 2500 हेक्टर आहे, त्यांनी आतापर्यंत 560 हेक्टरवरील ऊसाची उचल कली आहे. जवाहर, पंचगंगा, घोरपडे कारखाने पूरबाधित ऊस उचलीत फारच मागे आहेत. यंदा हंगाम जेमतेम तीन महिने चालेल, अशी परिस्थिती आहे. एकंदरीत साखर कारखानादारांची मानसिकता पाहता हंगाम संपेपर्यंत टप्प्याटप्प्याने पूरबाधित ऊसाची उचल करण्याचे नियोजन दिसत आहे.
पूरबाधित ऊस एकदम तोडल्यास साखर उतार्यावर परिणाम होणार आहे. सध्या सर्वच कारखान्यांना उतारा तुलनेत कमी आहे. या धास्तीमुळेच पूरबधित ऊसाकडे दुर्लक्ष केले जात आहे.
यावेळी प्रा. एन.डी. पाटील, वीजतज्ञ प्रताप होगाडे, माची आम. उल्हास पाटील, बाबासाहेब पाटील, विक्रांत पाटील, मारुती पाटील, महावितरणचे अभियंता अंकुर कावळे, कार्यकारी अभियंता सागर मारुलकर, तहसीलदार अर्चना कापसे, साखर उपसंचालक एन.एस. जाधव आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.