शेतकरी सुत झाला न्यायाधीश

जिंतूर (परभणी) : 2019 या वर्षामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे न्यायाधीश पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये सेवानिवृत्त कामगार आणि सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले दत्ताराव निवृत्ती गीते यांचा मुलगा विष्णु गीते हा इच्छाशक्तीच्या बळावर न्यायाधीश झाला आहे. त्याचे हे यश जिंतूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत ग्रामीण युवकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

कामाच्या शोधात दत्तराव गीते यांनी शेतीवर गुजराण होत नसल्याने मुलांच्या शिक्षणासाठी तीस वर्षांपूर्वी गाव सोडले. पुण्यात आल्यानंतर विष्णु गीते यांनी कला शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातील आय.एल.एस विधी महाविद्यायात प्रवेश घेतला. 2012 मध्ये त्यांनी वकीलीचे शिक्षण पूर्ण केले. पुणे येथील बी.ई. आव्हाड लॉ क्लासेसचे प्रा. गणेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनानुसार विष्णु गीते यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. आणि यश मिळवले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी परिस्थितीला सामोरे जात स्वत:शी प्रामाणिक रहावे, आपल्यातील उणिवा कठोर परिश्रमाने दूर करा, ध्येय निश्‍चित करा, यश नक्कीच मिळेल, अशी प्रतिक्रिया विष्णू गीते यांनी व्यक्त केली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here