काठमांडू : नेपाळ सरकारने गाळप हंगाम 2019-20 साठी ऊसाची किंमत वाढवली नाही, तसेच गेल्या वर्षीप्रमाणे 536.56 रुपये प्रति क्विंटल वरच किंमती स्थिर ठेवल्या आहेत, ज्यामध्ये प्रति क्विंटल 65.28 रुपयांचे अनुदानही सामिल आहे. यामुळे या वर्षी किंमत वाढण्याची आपेक्षा असणारे शेतकरी निराश झाले आहेत. साखर कारखाने आणि शेतकऱ्यांच्या सहमतीने ही किंमत निश्चित केली असल्याचा दावा सरकारने केला आहे.
नेपाळच्या संचार एवं सूचना प्रौद्योगिकी मंंत्रालयाने सांगितले की, सोमवारी झालेल्या कैबनेटच्या बैठकीमध्ये ऊसाचे मूल्य आणि अनुदान निश्चित करण्यात आले आहे. या किंमतीमध्ये ऊसाचे उत्पादन मूल्य, वाहतुक भाडे, लाभ आणि सरकारने घोषित केलेले अनुदान यांचा समावेश आहे. कृषी आणि पशुधन विकास मंत्रालयाच्य शिफाारशीनुसा प्रत्येक गाळप हंगामापूर्वी ऊस मूल्य घोषित केले जाते. या वर्षी जवळपास १ महिना उशिर झाला. शेतकरी आणि साखर उत्पादक यांच्या मधील संघर्ष कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षापासून नेपाळ सरकारकडून प्रत्येक वर्षाचे ऊस मूल्य निश्चित केले जात आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.