पारगाव, पुणे : सन 2019-20 च्या गाळप हंगामात ऊसाला 2690 रुपये प्रतिटन इतका पहिला हप्ता देण्याचा निर्णय येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने घेतल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळसाहेब बेंडे यांनी दिली. ही रक्कम शुक्रवारी ऊसउत्पादकांच्या बँक खात्यावर जमा केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत एफआरपीनुसार 2690 रुपये प्रथम हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बाळासाहेब बेंडे म्हणाले की, चालू हंगामात 15 डिसेंबर अखेर एक लाख आठशे सदतीस टन ऊसाचे गाळप झाले आहे. 2690 रुपये प्रतिटनाप्रमाणे 27 कोटी 12 लाख 52 हजार रुपये ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. तरी कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादकांनी भीमाशंकर कारखान्यास ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन बेंडे यांनी केले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.