मेक्सिको सिटी: यावर्षी डिसेंबर 21 पर्यंत मेक्सिको मधील साखर उत्पादन 4,17,341 मेट्रीक टनपर्यंत पोचले आहे. गेल्या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे उत्पादनात घट झाली आहे.
एकूण 25 कारखान्यांनी या हंगामात सामान्य कालावधीनंतर ऊस गाळपाच्या हालचाली सुरु केल्या आहेत. केवळ 7 कारखान्यांनी वेळेत काम सुरु केले आहे.
देशात कारखान्यांनी या हंगामात आतापर्यंत 4.67 मिलियन टन ऊस गाळप केले आहे, गेल्या वर्षी याच कालावधीत 6.88 मिलियन टन ऊस गाळप केले गेले होते. गेल्या वर्षी 85,270 हेक्टर च्या तुलनेत या हंगामात एकूण 56,830 हेक्टर ऊस तोडणी झाली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.