बांबवडे: येथील अथणी शुगर्स या कारखान्याने नूतन उभारणी केलेल्या प्रतिदिनी ९० हजार लिटर क्षमतेच्या अदयावत डिस्टिलरी प्रकल्प पुण॔ काय॔क्षमतेने सुरु झाला असून सध्या उच्च प्रतीचे स्पिरीट व इथेनॉलचे उत्पादन सुरु आहे. सदर प्रकल्पातून तयार होणाऱ्या उच्च प्रतीच्या स्पिरीट व इथेनॉलला राज्यात व राज्याबाहेर प्रचंड मागणी असून यामुळे कारखान्यास गाळपास येणा-या ऊसास चांगला दर देण्यास मदत होणार असल्याचे कारखान्याचे एक्सिक्युटीव्ह डायरेक्टर योगेश पाटील यांनी स्पिरीट विक्री उदघाटन प्रसंगी काय॔क्रमात सांगितले.
सध्या कारखान्याचा ऊस गळीत हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरु झाला आहे. आजअखेर कारखान्याचे 46 दिवसात 145000 मे.टन. ऊस गाळप झाले असून 18700 मे.टन. साखरचे उत्पादन झाले आहे सरासरी साखर उतारा 12.47 टक्के इतका आहे.
अथणी शुगर कडून साखर कारखाना व आसवणी प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने सुरु आहेत तरी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करण्याचे आवाहन कारखान्याचे युनिट हेड देशमुखसो यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे डिस्टिलरी मॅनेजर श्री किरण मुधाळे, चीफ इंजिनियर श्री सजेराव पाटील, चीफ केमिस्ट प्रल्हाद पाटील, प्रोजेक्ट इंजिनियर स्वप्नील देसाई, मुख्य शेती अधिकारी लठ्ठे साहेब, अवधुत पाटील व इतर आधिकारी, कम॔चारी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.