नवी दिल्ली : ब्राजीलच्या कृषी, पशुधन आणि पुरवठा मंत्री टेरेजा क्रिस्टीना कोरिया दा कोस्टा डायस च्या एका प्रतिनिधीमंडळाने गुरुवारी केंद्रीय ग्राहक प्रकरणात, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्र्यांची भेट घेतली.
ब्राजील च्या प्रतिनिधीमंडळाने या भेटीदरम्यान केंद्रीय खाद्य मंत्र्यांसह दोन्ही देशांमध्ये साखर आणि इथेनॉल तंत्रज्ञान मधील भागीदारीसह इतर मुद्द्यांवर चर्चा केली. भारत जगातीत सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. तर ब्राजील दुसरा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. ब्राजील दोन वर्षांपूर्वी पर्यंत साखरेचा सर्वात मोठा उत्पादक देश होता, पण आता ब्राजील साखरेऐवजी इथेनॉलच्या उत्पादनाला प्राधान्य देत आहे.
प्रतिनिधीमंडळाशी झालेल्या भेटीनंतर पासवान म्हणाले, ब्राजील च्या कृषी, पशुधन आणि पुरवठा मंत्री टेरेजा क्रिस्टीना यांच्यासह आलेल्या विविध क्षेत्रातील तज्ञां च्या प्रतिनिधीमंडळाशी दोन्ही देशातील उद्योग आणि तंत्रज्ञानाबाबत देवाण घेवाणीची चर्चा झाली.
पासवान म्हणाले, ब्राजील साखरेचा प्रमुख उत्पादक देश आहे आणि साखरेशी संबंधित तंत्रज्ञान भागिदारीच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. दरम्यान, यावेळी केंद्रीय खाद्य एवं सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सचिव रविकांत यांच्यसह मान्यवर उपस्थित होते.
पासवान यांनी दोन्ही देशांमधील राजकीय संबंध आणि रणनितीच्या भागीदारीबाबत बोलताना सांगितले की, दोन्ही देशात विविध आंतरराष्ट्रीय मुद्दयांवर एकमत आहे.
त्यांनी भारत सरकार द्वारा आपल्या नागरीकांच्या अन्नसुरक्षा निश्चित करण्यासाठी केलेल्या उपायांबाबत प्रतिनिधीमंडळाशी चर्चा केली. ते म्हणाले, भारतात जवळपास 80 करोड लोकांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत सामिल केले आहे. आणि या लाभाथ्यांंना भारत सरकारकडून स्वस्त किराणा उपलब्ध करुन दिला जातोे.
त्यांनी सांगितले की, , भारताने पहिल्यांदाच कापूस, मका, सोयाबीन सारख्या कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी ब्राजीलला मंजूरी दिली आहे.
पासवान यांनी भारतीय नागरीकांसाठी वीज मुक्त यात्रेवरुन ब्राजीलने नुकत्याच केलेल्या घोषणेसाठी ब्राजीलचे आभार मानले आहेत. टेरेजा क्रिस्टीना कोरयिा दा कोस्टा डायस यांनी सांगितले की, साखर वं इथेनॉल शी संबंधित तंत्र, संशोधना मध्ये सहयोगासाठी दोन्ही देश एक दुसर्याच्या अनुभवाची भागिदारी करतील. ते म्हणाले, पेट्रोल मध्ये योग्य प्रमाणात इथेनॉल मिसळल्यामुळे प्रदूषण व जलवायु परिवर्तनाच्या दिशेवर चांगले काम केले जावू शकते.
त्यांनी भारतीय कृषी संशोधन परिषद आणि राष्ट्रीय शर्कला संस्थान यांच्या बरोबर सामंजस्य करारावर सह्या करण्याचा प्रस्ताव दिला आहे, ज्याच्या अंतर्गत दुग्ध उत्पादन ऊस व इथेनॉल सह अन्य उत्पादनांची तंत्रज्ञानात भागिदारी केली जावू शकते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.