महाराष्ट्रातील साखर उद्योगाला हवे उत्तर प्रदेश प्रमाणे पॅकेज

मुंबई : महाराष्ट्रात असंख्य समस्यांना तोंड देणार्‍या साखर उद्योगाने अर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांकडे मदत मागितली आहे. साखर उद्योग अर्थिक मंदी आणि अव्हानांमुळे गंभीर अर्थिक संकटातून जात आहे. या उद्योगाशी संबंधीत अनेक दिग्गजांकडून गुरुवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि बिहार यांच्या पॅटर्नप्रमाणे अर्थिक पॅकेज, कर्जाचे पुर्नगठन आणि देशामध्ये विक्रीला गती देण्यासाठी 250 रुपये प्रति क्विंटल इतके वाहतुक अनुदानाची मागणी केली आहे.

साखर कारखान्यांचा दावा आहे की, साखरेचे विक्री मूल्य 3,100 रुपये प्रति क्विंटल आणि उत्पादन खर्च 3,400 रुपये प्रति क्विंटल आहे. अशा अडथळ्यांमध्यें, कारखान्यांकडून शेतकर्‍यांना एफआरपी द्यावी लागते. केंद्र सरकारकडून घोषित आधारभूत किंमत आणि उत्पादन मूल्य यांच्या मध्ये प्रति क्विंटल 300 रुपयाचे अंतर आहे. यामुळे अर्थिक दबाव आधिक वाढत आहे. म्हणून कारखान्यांनी मागणी केली आहे की, राज्य सरकारने ताबडतोब उत्तर प्रदेशच्या धर्तीवर आर्थिक पॅकेज देण्याची गरज आहे.

Audio Player

यह न्यूज़ सुनने के लिए प्ले बटन को दबाये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here