अर्थसंकल्पात साखर उद्योग साठी ठोस तरतूद नाही: राजू शेट्टी

कोल्हापूर: अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी भरीव दिले असे सांगितले जात आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी हा फक्त बुडबुडा आहे. अर्थ संकल्पात साखर उद्योगसाठी ठोस तरतूद दिली गेली. नाहीफक्त योजना आखून शेती सुधारत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतोय, आत्महत्या वाढत आहे, पायाभुत सुविधांचा अभाव आहे, नवीन तंत्रज्ञान मिळत नाही, नवीन संशोधनाकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. या गोष्टींकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. शेतीसाठी कसलीही भरीव तरतूद केली नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.

ते म्हणाले, प्रत्यक्षात कृषीक्षेत्रासाठी 1 लाख 60 हजार कोटीची तर 1 लाख 23 हजार कोटी हे जलसंधारण ग्रामीण विकासासाठी केली. मात्र देशाचे आकारमान बघता आणि शेती क्षेत्राची झालेली फरपट बघता. ही तरतूद खूप तुटपुंजी आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मता सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये त्यांनी कृषी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामीण भाग आदी क्षेत्रांना चालना देण्याच्या दृष्टीने भरीव तरतूद केली आहे.

अडीच तासांपेक्षा अधिक कालावधी हा अर्थसंकल्पाचे वाचन करण्यासाठी लागला. या अर्थसंकल्पामध्ये आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. याबरोबरच अर्थसंकल्पातील वेगवेगळ्या बाबींवर घेतलेल्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here