भवानीनगर : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील कामगाराना तीन महिने पगार दिलेला नाही. संक्रांत वेळी अॅडव्हान्स दिलेला नाही. तीन वर्षाचा दिवाळी बोनस फायनल नाही, कारखाना पतपेढीतीलकाढलेले कर्ज हे कामागारांच्या पगारातून हप्त्यापोटी कट केले जात आहे, परंतु सात महिने होवून गेले पतपेढीमध्ये पैसे कारखान्याने न भरल्याने त्याचेही व्याज विनाकारण कामगारांच्या वरती पडलेले आहे. या बाबत श्री छत्रपती साखर कारखान्यासमोर कामगारांनी आंदोलन केले. यावर कारखान्याच्या वतीने सर्व संचालक मंडळाने निर्णय घेवून येत्या 20 फेब्रुवारीला एक पगार आणि महिन्याच्या शेवटपर्यंत एक पगार असे देण्याचे मान्य केल्याने हे कामगारांचे आंदोलन मागे घेण्यात आले.
श्री छत्रपती साखर कारखान्यातील कर्मचार्यांना पगार न गेल्याची घटना 65 वर्षातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे या कारखान्याची वाटचाल नक्की कोणत्या दिशेने चालू आहे असाही सवाल साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केला आहे.
ते म्हणाले, छत्रपती सहकारी साखर कारखान्याला 65 वर्षे झाली या 65 वर्षाच्या उस गाळपाच्या हंगामात सध्याच्या संचालक मंडळाने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. कामगारांना तीन महिने होवून गेले पगार नाही. त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाचे, एलआयसीचे, पतपेढीचे हप्ते भरले नाहीत. जीएसटी भरण्याची थकलेली आहे. या सर्व गोष्टी घडत असताना कारखान्यात गाळप सुरु अहे. साखर तयार होत आहे. कारखान्यात कामगार काम करीत आहेत. आजची आर्थिक अवस्था पाहता कारखाना सध्यातरी दिशाहीन झालेला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.