बांगलादेश करणार 100,000 टन साखर आयात

ढाका: बांगलादेश साखर आणि अन्न उद्योग कॉर्पोरेशन रमजानच्या महिन्यासाठी पुरवठा सुरळीत करण्यासाठी 100,000 टन साखर आयात करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती राज्य खरेदीदाराच्या अधिकाऱ्यांनी दिली. निविदा जमा करण्याची शेवटची तारीख १४ मार्च आहे, अशी माहिती सरकारी बांगलादेश साखर आणि अन्न उद्योग महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

एप्रिलच्या शेवटी रमजान सुरू होण्यापूर्वी जेव्हा पारंपारिकपणे या वस्तूंची जास्त मागणी वाढत जाते, त्यामुळे बांगलादेश देखील आवश्यक वस्तू आयात करणार आहे.

दक्षिण आशियाई देश आपल्या वार्षिक १.४ दशलक्ष टनांची मागणी पूर्ण करण्यासाठी आयात केलेल्या साखरेवर मुख्यत्वे अवलंबून आहेत. खासगी रिफायनर बहुधा ब्राझीलमधून कच्ची साखर आयात करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here