मरवडे, जि. सोलापूर : फॅबटेक शुगरकडून २०१७-१८ या गळीत हंगामात प्रतिटन दोन हजार २५० रुपयांप्रमाणे दर देण्यात आला. हा दर देत असताना काही शेतकऱ्यांना प्रतिटन ३०० रुपयांप्रमाणे दर कमी देण्यात आला. सर्वच शेतकऱ्यांना समान दर देण्यात यावा, यासाठी शेतकऱ्यांनी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेळोवेळी कारखाना व्यवस्थापनाकडे तक्रार केली. त्यानंतर उर्वरित ३०० रुपये ऊसबिलातील २०० रुपयांप्रमाणे ऊसबिल देण्यात आले. आता राहिलेले १०० रुपये मिळावेत म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले थकीत ऊसबिल ताबडतोब दिले जाईल, असे आश्वासन कारखाना प्रशासनाकडून दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आता काही प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून शेतकऱ्यांच्या लेखी मागणीप्रमाणे थकीत ऊसबिल देण्याची ग्वाही वित्त अधिकारी रघुनाथ उन्हाळे यांनी दिली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या ठिय्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राहुल घुले, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, मंगळवेढा तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, रणजीत बागल, विजयकुमार पाटील, राजेंद्र बाळू कपले, शंकर संगशेट्टी, अप्पू पाटील यांच्यासह बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.