अडवणूक करणाऱ्या साखर कारखानदारांविरोधात कारवाई करावी: शेतकरी संघटनांची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कारखानदार ऊस नोंदीच्या करारनाम्यात बेकायदेशीर अटी टाकून गेल्या काही दिवसांपासून संमतीपत्रे घेत आहेत. कारखान्याकडे रक्कम जमा होईल तशी ऊसाची बिले शेतकऱ्यांना दिली जाणार आहेत. एफआरपीचे तुकडे पाडल्यावर कारखान्याकडे व्याज मागणार नाही. कुठेही तक्रार करणार नाही, असे बळजबरीने लिहून घेतले जात आहे. अशा कारखान्यांवर कारवाई करावी, असे निवेदन शेतकरी संघटनांनी पुणे येथील साखर आयुक्त सौरभ राव यांना दिले.

अंकुश, जय शिवराय, बळीराजा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले. संघटनेच्यावतीने शिवाजी माने, धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली राव यांना भेटून निवेदन देण्यात आले.

दरम्यान, एफआरपीचे तुकडे पाडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जाईल, असे साखर आयुक्त राव यांनी शिष्टमंडळाला सांगितले. शुगर केन कंट्रोल ऑर्डरनुसार एफआरपी थकवल्यास १५ टक्के व्याज द्यावे लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here