जकार्ता : गेल्या वर्षाच्या दुष्काळामुळे इंडोनेशिया चे यंदाचे साखर उत्पादन 2 ते 2.1 दशलक्ष टन दरम्यान राहण्याची शक्यता आहे. बुधवारी इंडोनेशिया शुगर एसोसिएशन उद्योग संस्थेने साखरेच्या किमती स्थिर राहण्यासाठी आयातीसाठी आवाहन केले. इंडोनेशिया शुगर एसोसिएशन चे कार्यकारी निदेशक बुदी हिदायत म्हणाले, कमी उत्पादनामुळे इंडोनेशियाला 1.4 दशलक्ष टन कच्ची साखर किंवा 1.3 दशलक्ष टन पांढऱ्या साखरेची नाइलाजाने आयात करावी लागेल.
हिदायत म्हणाले, जर लवकरात लवकर पुरवठा झाला नाही तर बाजारात साखर कमी होईल. यामुळे उद्योग आणि घरगुती वापरासाठी स्पर्धा ही होईल. 2020 मध्ये साखरेचा घरगुती वापर 3.2 दशलक्ष टन आहे, जो 2019 च्या 3.1 दशलक्ष पेक्षा थोडा जास्त आहे. गेल्या वर्षाखेरीस एका अधिकाऱ्याने सांगितले की, इंडोनेशिया ने औद्योगिक वापरासाठी 3.2 दशलक्ष टन कच्ची साखर आयात करण्यास अनुमती देण्याची योजना बनवली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.