घाना: घाना येथील कोमेन्डा साखर कारखाना साइट मॅनेजर श्रीनिवास राव यांनी सांगितले की, त्यांच्या कारखान्याला तोटा होण्यापासून वाचवण्यासाठी आणि कारखाना चावण्यासाठी कारखान्याच्या उसाच्या अवशेषापासून तीन मेगावॅट वीजेची निर्मिती करण्याची योजना आहे. या कारखान्याला 2015 च्या दरम्यान मोठ्या उर्जा संकटाशी सामना करावा लागला होता.
राव म्हणाले, तीन मेगावॅट च्या विज निर्मितीमध्ये दोन मेगावॅट विज कारखान्यात वापरली जाईल. उर्वरीत एक मेगवॉट विज कोमेडा मध्ये आणि त्याच्या आसपास राहणार्या रहिवाशांच्या वापरासाठी नॅशनल ग्रेड च्या माध्यमातून वितरीत केले जाईल. राव म्हणाले, यामुणे कारखान्यात अखंड विजपुरवठा होत राहील.
राष्ट्रीय जनतांत्रिक काँग्रेस च्या केंद्रीय संचार टीम च्या कारखान्याच्या दौर्याच्या दरम्यान राव बोलत होते. ते म्हणाले, विज उत्पादनासाठी पुढच्या महिन्यात इक्विपमेंट आणली जातील आणि पुढील चार पाच महिन्यांमध्ये काही प्रकल्प सुरु केले जातील. पूर्ण प्रकल्प डिसेंबरपर्यंत कार्यान्वित होईल. ते म्हणाले, पाणी आणि वीजेचा पुरवठा येथील मुख्य समस्या आहे. यामुळे प्रकल्पादरम्यान अडचणी येत आहेत. त्यांनी सरकारला निवेदन केले की, सरकारने निर्धारीत वेळेत परियोजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य द्यावे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.