टांझानिया करेल 30 हजार मीट्रिक टन साखरेची आयात

कंपाला (युगांडा): युगांडा ने आपल्या शेजारील देश टांझानिया ला 30 हजार मेट्रीक टन साखरेची निर्यात करण्याचा करार केला आहे. टांझानिया ने स्पष्ट केले आहे की, हा करार दोन देशांच्या सरकारा दरम्यान आहे आणि यामध्ये खाजगी क्षेत्राची भागीदारी असणार नाही.

युगांडाच्या साखर कारखान्यांच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेले टांझानियाचे कृषी मंत्री जेफेथ हसुंगा यांनी बुधवारी सांगितले की, टांझानिया सरकारने या अटीवर युगांडातून साखर आयातीला मान्यता दिली आहे की, हा करार दोन्ही देशांच्या सरकारा दरम्यान होणार. ही व्यावसायिक हिस्सेदारी खाजगी डिलरांसाठी असणार नाही. युगांडामध्ये साखर उत्पादनाचे सध्याचे दर चांगले आहेत, ज्यामुळे तंजानिया संतुष्ट आहे. सुरुवातीला 30,000 मेट्रिक टन आयात केली जाईल. साखर कारखान्यांकडून निश्चित केलेल्या किमती वर पुढची ऑर्डर मिळेल की नाही हे अवलंबून असेल. त्यांनी सांगितले की, टांझानिया मध्ये पूर्वी अफ्रीकी देशांमध्ये उत्पादीत सर्व गोष्टींवर एक नियम लागू आहे, तसेच युगांडासाठी आयात शुल्कात कोणताही बदल केला जाणार नाही.

युगांडाचे व्यापार मंत्री अमेलिया क्यूमबड़े यांनी याला युगांडाच्या साखर कारभारासाठी चांगला करार असल्याचे सांगून ते म्हणाले,टांझानियाच्या मंत्र्यांच्या यात्रेतून दोन्ही देशा दरम्यानचे व्यापारी संबंध सशक्त होतील. युगांडा एक साखर अधिशेष देश आहे आणि या करारामुळे हे सिध्द होते की, युगांडा जवळ साखर निर्यात करण्याची क्षमता आहे.

टांझानियाने एक वर्षापूर्वी युगांडाकडून साखर आयात बंद केली होती. गेल्या काही दिवसात
युगांडा चे राष्ट्रपति योवेरी मुसेवेनी आणि टांझानिया चे राष्ट्रपति जॉन मैगुफुली यांच्या मध्ये झालेल्या बैठकीनंतर टांझानिया चे अधिकारी युगांडा दौऱ्यावर आले. हसुंगा ने सर्व पूर्वी अफ्रीकी देशां दरम्यान एकतेच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान पुन्हा व्यापार सुरु करण्याची सूचना केली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here