कोरोनोवायरस (COVID -19) च्या प्रसारामुळे जगातील कारभार पूर्णपणे बिघडला आहे. जवळपास प्रत्येक क्षेत्राला या रोगाने ग्रासले आहे. या सर्वात मोठा परिणाम कच्च्या तेलावरही झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 30 टक्के इतकी मोठी घट नोंदली गेली आहे.
अलीकडेच OPEC देशांमध्ये कच्च्या तेलाचा पुरवठा कमी करण्यासंदर्भात झालेली चर्चा अयशश्वी झाली. कमी मागणीमुळे पुरवठा कमी करण्याच्या निर्णयात रुस ने पाय मागे घेतला आहे. यानंतर लगेचच सौदी अरब येथील अरामको ने तेलाच्या किंमतीत मोठी घट करण्याची घोषणा केली, यामुळे तेल बाजारात प्राइस वार होण्याची भिती निर्माण झाली आहे.
1991 च्या खाड़ी युद्धा नंतर तेल बाजारात अंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्यूचर 30 डॉलर प्रति बैरल पर्यंत आला आहे. गोल्डमैन सैश च्या विश्लेषकांच्या अंदाजानुसार, कच्च्या तेलाच्या किमती 20 डॉलर प्रति बैरल होऊ शकतात. यामुळे डिझेल आणि पेट्रोल च्या दरातही घट होण्याची शक्यता दिसून येत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.