किसुमु (केनिया): केनियाच्या राष्ट्रीय पर्यावरण व्यवस्थापन प्राधिकरण (Nema) ने परिसरामध्ये प्रदूषण पसरवल्यामुळे इथल्या किबोस शुगर एंड एलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड (KSAIL) ला प्रदूषण थांबवण्यासाठी उपाय करण्यापर्यंत कारखाना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत , ज्यामुळे साखर कारखान्यात काम करणाऱ्या 4,500 लोकांची नोकरी धोक्यात आली आहे.
किसुमू काउंटी मध्ये असणाऱ्या या कारखान्या विरोधात अनेक वर्षांपासून प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिक लोक आणि संघटनाही करत होत्या. नेमा ने कारखान्याला नोटीसा आणि प्रदूषण निवारणाचे उपाय करण्यासाठी पुरेसा वेळ ही दिला, पण कारखान्याने काहीच केले नाही. त्यानंतर नेमा च्या प्रतिनिधींनी या परिसराचा दौरा करुन पाहणी केली आणि होत असलेले प्रदूषण पाहून तात्काळ कारखाना बंद करण्याचे आदेश दिले. दौऱ्यानंतर नेमा चे कार्यवाहक महासंचालक मामो बोरू यांनी सांगितले की, ही कंपनी आपला प्रदूषित कचरा आणि सांडपाणी किबोस नदीमध्ये सोडते, यामुळे या नदीचे पाणी वापरणाऱ्या अनेक स्थानिक कुटुंबांना भयानक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
इकडे KSAIL व्यवस्थापन ने Nema च्या निर्णयाला कठोर आणि “स्थानीक अर्थव्यवस्थेसाठी घातक ” असल्याचे सांगून आता कंपनीतून कर्मचार्याची कपात करण्याचा इशारा दिला आहे. संचालक सुकविंदर राजू म्हणाले कि, कंपनी दर महीन्याला 400 ते 500 मिलियन शिलींग कमावते. कारखाना बंद झाल्यास कंपनी कर्मचारी आणि मजूरांना वेतनही देऊ शकणार नाही आणि त्यांना घरी बसावे लागेल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.