अमेठी(उत्तरप्रदेश): अमेठी येथे सुरु असलेल्या कार्यक्रमात कॉंग्रेस एमएलसी, दीपक सिंह यांनी साखर विक्रीसाठी १३ रुपये प्रतिकिलो दराने स्टॉल्स लावले. यावेळी दीपक सिंह म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी साखर प्रति किलो १३ रुपये दराने उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन स्मुर्ति इराणी यांनी अमेठी तील जनतेला दिले होते. यामुळे हे इथे आम्ही प्रति किलो 13 रुपये दराने साखर विकत आहोत.
सिंहयांचा आरोप आहे कि इराणी यांनी जनतेला दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळे काँग्रेसला भाजपचे ध्यान आकर्षित करण्यासाठी अश्या पद्धतीने १३ रुपये प्रति किलो दराने साखर विक्री साठी स्टॉल मांडावे लागत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.