कोल्हापूर, सांगलीचा ऊस लोकरी माव्याच्या विळख्यात

कोल्हापुरसह सांगली जिल्ह्यातील बहुतांशी उसाचे क्षेत्र लोकरी माव्याच्या विळख्यात सापडले आहे. कोल्हापुरात नदीकाठी असणारा ऊस दहा ते पंधरा दिवस पुराच्या पाण्याखाली राहिल्यामुळे खराब झाला आहे, असे एकूण किमान हा सात ते आठ हजार हेक्टर वरील गोष्ट खराब झाला आहे. आता पुराचे संकट कमी झाले मात्र लोकरी माव्याने आक्रमण केल्यामुळे ऊस वाढीस मोठा अडथळा येत आहे. कृषी विभाग कोल्हापूर जिल्ह्यात किती टक्के लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे याची माहिती घेत आहेत. लोकरी माझ्यामुळे उसाचे वजन उंची आणि उतारा कमी भरतो याचा थेट फटका शेतकर्‍यांना बसत आहे बसणार आहे. पावसाळ्यानंतर सुरू होणारा हिवाळ्यामध्ये हा रोग जास्तीत जास्त प्रमाणात वाढू लागतो. त्यामुळे आतापासूनच शेतकरी यावरती उपाय शोधून औषध फवारणी तसेच इतर पर्याय निवडू लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांना लोकरी माव्याचा प्रतिबंध कसा करावा याची माहिती नसल्याने याचा बिमोड करण्यास ते असमर्थ ठरत आहेत. अशा वेळी कृषी विभागाने अशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली जात आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here