बहिणी-मुलींच्या लग्नासाठी मिळावी 80 टक्के ऊस थकबाकी

मेरठ(उत्तरप्रदेश) : कारखान्यांकडून एफआरपी मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना मुलीच्या, बहिणीच्या लग्नात असंख्य अडचणी येत आहेत. म्हणून मुलींच्या लग्नात तरी शेतकऱ्यांना 80 टक्के एफआरपी मिळावी, असा निर्णय ऊस सहकारी समितीच्या बोर्ड बैठकीमध्ये एकमताने घेण्यात आला.

शनिवारी नगर पंचायतीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत अर्थिक वर्ष 2019-20 मध्ये झालेला खर्च आणि 2020-21 च्या अंदाज पत्रकावर चर्चा करण्यात आली. यानंतर ऊसाचे पैसे, नवे बियाणे, गोदामातील खते आणि किटक नाशके याबाबतही चर्चा करण्यात आली. समितीतील कमी कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबतही चिंता व्यक्त करुन लवकरच ही संख्या वाढवण्या बाबत मागणी करण्यात आली. या बैठकी दरम्यान मुलीच्या लग्नात 80 टक्के एफआरपी भागवावी अशी मागणी करण्यात आली, यावर याबाबत लवकरच आशादायक पावले उचलण्याचे आश्वासन कारखान्यातील अधिकाऱ्यांनी दिले.

ऊस समितीचे चेअरमन अशोक चौधरी म्हणाले, कारखाना आणि समितीने निर्णय घेतला आहे की जोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस करखान्यात पोचत नाही तोपर्यंत कारखाना सुरु राहील. ते म्हणाले, चौधरी चरण सिंह यांची प्रतिमा लावल्याबाबत सर्वांनीच सहमती दर्शवली आहे.

यावेळी ऊस परिषदेचे चेअरमन जयप्रकाश, देशपाल प्रधान, नरेश तोमर, डॉयरेक्टर तफरूज, राजेंद्र कुमार, सुरेंद्र राणा, सुभाष सैनी, जितेंद्र राणा, हरवीर प्रधान, ऊस समिति चे सचिव भास्कर रघुवंशी सह सर्व मान्यवर उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here