आता ड्रायव्हिंग लायसन्स जवळ नसले तरी नो टेन्शन !

ट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय
केंद्रीय परिवहन मंत्रालयाने वाहनधारकांसाठी एक गुड न्यूज आणली आहे. तुम्ही मोटारसायकल अथवा कारने कुठे फिरायला गेला आणि तुम्हाला ट्राफिक पोलीसने अडविले आणि जर का तुमच्याकडे लायसन्स नसेल तर काळजी करण्याची बिलकुल गरज नाही. वाहतूक मंत्रालयाने ट्राफिक पोलीस आणि राज्यातील अन्य वाहतूक विभागांना आदेश दिला आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स पेपरसारख्या कागदपत्रांची मूळ प्रत तपासणीसाठी घेतली जाऊ नये. डिजीलॉकर (DigiLocker) किंवा एमपरिवहन (mParivahan) अॅपमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी दाखवली तरी चालणार आहे.

यामध्ये ट्राफिक पोलीस आपल्याकडील मोबाइलवरुन क्यूआर कोड स्कॅन करत चालक किंवा वाहनाची संपुर्ण माहिती डेटाबेसवरुन मिळवू शकतात. केंद्राने राज्यांमधील वाहतूक विभाग आणि ट्राफिक पोलिसांना तपासणी करण्यासाठी मूळ कागदपत्रं घेऊ नका असा आदेश दिला आहे.

भरधाव गाडी चालवणे, सिग्नल जम्प करणे किंवा गाडी चालवताना फोनवर बोलणे अशा प्रकरणी ट्राफिक पोलीस कारवाई करत कागदपत्र जप्त करतात. आता नव्या नियमानुसार केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, ई डेटाबेसच्या आधारे पोलीस संबंधित वाहन आणि वाहनचालकाची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. त्यासाठी कागदपत्रांची मूळ प्रत जमा करण्याची काहाही गरज नाही.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here