नवी दिल्ली : 26 मार्चला काढलेल्या आदेशानुसार सरकारच्या खाद्य मंत्रालयाने एप्रिल साठी देशाच्या 545 कारखान्यांना साखर विक्रीचा 18 लाख टन कोटयाचे वाटप केले आहे.
एप्रिल 2020 साठी वाटप करण्यात आलेला कोटा एपिल 2019 च्या महिन्याच्या कोटयाप्रमाणेच आहे. पहायला गेल तर गेल्या वेळेपेक्षा यावेळी कमी साखरेचे वाटप करण्यात आले आहे. खाद्य मंत्रालयाकडून मार्च 2020 साठी 21 लाख टन साखर कोटयाला मंजूरी दिली होती.
साखर कारखान्यांनी मार्च 2020 साठी वाटप करण्यात आलेला कोटा बाजारातील कमी मागणीमुळे साखर विक्रीसाठी खूपच प्रयत्न केले. कोरोना वायरस महामारीच्या प्रसारामुळे साखर कारखान्यांची साखर पुरवठा साखळी वर परिणाम झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच, कोरोना वायरस चा धोका पाहता खाद्य मंत्रालयाने मार्च साठीची साखरेची मासिक विक्रीची मुदत 15 दिवस वाढवून 15 एप्रिल 2020 पर्यंत करण्याचा निर्णय घेतला होता.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.