नवी मुंबई: कोरोना वायरसची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे सर्वांनाच अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना ला रोखण्यासाठी वाशीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC मार्केट) ने शनिवारी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याची कोरोना वायरस टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
APMC के सचिव अनिल चव्हाण म्हणाले, फळे, भाजी, कांदा आणि बटाटयाच्या बाजाराशी संलग्न असलेल्या संघटनांनी नवी मुंबईत वाढत चाललेल्या कोरोना प्रकरणामुळे बाजार बंद ठेवण्याचे निवेदन दिले. तेव्हा प्रशासनाने याची दखल घेत पुढचा आदेश येई पर्यंत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
कांदा आणि बटाटा बाजाराचे सचिव अशोक वालुंज म्हणाले, मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, टिळक नगर मधील लोक रोज बाजारात येतात. ज्याप्रमाणे वायरस झुग्गी-झोपड़ी मध्ये पसरत आहे, त्यामुळे भिती वाटत आहे. यासाठी प्रशासनाने बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या दरम्यान, शेतकऱ्यांना मुंबईत बृहन्मुंबई नगर निगम (बीएमसी) कडून निश्चित केलेल्या मैदानावर आपला स्टॉक पाठवण्याचे सांगण्यात आले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.