ब्राझिलिया: ब्राझील येथील ऊस उद्योग संघ युनिका (UNICA) ने, ब्राझील सरकार कडून कोरोना वायरस महामारीचा परिणाम देशातील साखर आणि इथेनॉल उद्योगावर होऊ नये यासाठी मदत मागितली आहे. युनिका ने सांगितले की, कोरोनाचा इथेनॉल वर फार मोठा परिणाम झाला आहे. दरामध्ये घट झाल्यामुळे विक्री मूल्यापेक्षा कमी दरात इथेनॉलची विक्री होत आहे.
जर ही परिस्थिती अशीच राहिली तर कारखाने हंगाम सुरु असताना मध्येच बंद करावे लागतील. ज्याचा परिणाम ऊस शेतकऱ्यांसह इंधन पुरवठादार तसेच पुरवठा शृंखंला खंडित होण्यावर होऊ शकतो. एकूण 2.3 मिलियन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यांबरोबर 370 कारखाने आणि डिस्टिलरी, 70,000 ऊस पुरवठादारांना याचा धोका आहे. यासाठी सरकारने लवकरात लवकर पावले उचलावीत.