लखनऊ: कोरोना वायरस मुळे देशातील साखर कारखान्यांच्या गाळप कार्यावर मोठा परिणाम झाला असूनही, उत्तर प्रदेशातील साखर उत्पादनावर याचा फार परिणाम झालेला नाही. अलीकडच्या जाहीर झालेल्या आकडयांनुसार, उत्तर प्रदेशात मागच्या हंगामापेक्षा यंदा साखर उत्पादनात भर पडली आहे.
इंडियन शुगर मिल्स एसोसिएशन (ISMA) द्वारा उपलब्ध आकड्यांनुसार, उत्तर प्रदेश मध्ये 15 एप्रिल 2020 पर्यंत साखर कारखान्यांनी 108.25 लाख टन साखर उत्पादन केले, जे गेल्या वर्षी याच अवधीत 105.55 लाख टन इतके होते. राज्यात 119 पैकी 21 कारखान्यांनी गाळप बंद केले आहे.
साखर कारखान्यामध्ये गाळप कार्याचा वेग कोरोना मुळे मंदावला होता, आता ती गाडी नीट रूळावर येऊ शकेल. कारण उत्तर प्रदेश सरकारने लॉक डाउन दरम्यान साखर कारखान्यांसह 11 प्रकारचे उद्योग सुरु करण्याची सशर्त परवानगी दिली आहे.
या हंगामात साखर उत्पादन 15 एप्रिल पर्यंत 247.80 लाख टन झाले आहे, जे गेल्या वर्षी याच कालावधीत 311.75 लाख टन इतके होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.