कराड, जि. सातारा : सर्व उद्योग बंद पडले असताना शेती उद्योग सुरू आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे, मशागतीसाठी पैशांची गरज असताना अद्यापही कारखान्यांनी एफआरपी पूर्ण केली नाही. अशा ऊसाचे बिल (एफआरपी) थकवलेल्या कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करावी, अशी मागणी बळिराजा शेतकरी संघटनेने केली आहे. मागणीचे निवेदन साखर आयुक्तांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, २०१९-२० मधील ऊस हंगामाची सांगता झाली आहे. काही
कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ‘कोरोना’ सारख्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. लॉक डाऊन मुळे सध्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. त्यामुळे भाजीपाला शेतातच कुजून पडला आहे. काही शेतकऱ्यांनी तर बाजारपेठ
उपलब्ध नसल्यामुळे शेतीमाल रस्त्यातच टाकून दिला आहे.
कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या हक्काच्या एफआरपीची रक्कम त्यांना मिळाली पाहिजे, आणि जे कारखाने ही रक्कम भागवू शकत नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.