मदुराई : थेनी जिल्ह्यातील खाजगी साखर कारखान्यांमध्ये महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातून आलेले ऊसतोड कष्टकरी लॉइडाउनमध्ये अडकले आहेत. यामध्ये महिला आणि मुलांसह एकूण 103 लोक आहेत. 24 मार्चपासून लॉकडाउन मुळे ऊस तोडणी मजूर घरी जावू शकले नव्हते. ज्यामुळे साखर कारखान्यांमध्ये कष्टकर्यांसाठी भोजन आणि आरोग्य विभागाकडून त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. शनिवारी, जिल्हाधिकारी एम. पल्लवी बलदेव यांनी कुंबुम मध्ये खाजगी शाळेचा दौरा केला, जिथे ऊस कष्टकरी राहात होते. बलदेव ने त्यांच्याकडून सुविधा आणि भोजन याबाबत बोलल्यानंतर सांंगण्यात आले की, जोपर्यंत स्थिती सुधारत नाही, तोपर्यंत सरकार त्यांची हर प्रकारे मदत करेल.
एका वरिष्ठ अधिकार्यांने सांगितले की, 750 किलो ऊस तोडण्यासाठी कष्टकर्यांना प्रतिदिन 500 रुपये दिले जातात. गाळप हंगामा दरम्यान, दरवर्षी आपल्या कुटुंबासह कष्टकरी येथे येतात. गाळप पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या घरी जातात. पण अचानक लागु झालेल्या संचारबंदी च्या घोषणेनंतर त्यांना इथेच रहावे लागले. कारखान्याने भोजन आणि निवासाची सोय केली आहे आणि अधिकार्यांनी गहू, कांदा, तेल आणि इतर भाजीपालाही दिला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.