केनिया: साखर आयातीमध्ये फेब्रुवारीत 88 टक्के वाढ

नैराबी: केनिया मध्ये गेल्या वर्षाच्या अवधीच्या तुलनेत, फेब्रुवारीमध्ये साखर आयातीत 88 टक्के वाढ झाली. साखरेच्या स्थानिक वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी आयातीला गती दिली आहे. साखर संचालनालयाने सांगितले की, आयात गेल्या वर्षाच्या समान कलावधीमध्ये 27,375 च्या तुलनेत 51,423 टन झाली. स्थानिक उत्पादनात गेल्या वर्षाच्या तुलनेत अगदी किरकोळ पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. साखर संचालनालयाने ऊस उत्पादन वाढण्यासाठी सिंचन योजनेवर भर दिला आहे.

मुमियास आणि केमेलिल कारखाने बंद झाल्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. एक वर्षापासून बंद असलेला मुमियास शुगर कारखाना मोठ्या क्षमेतचा कारखाना होता, पण आर्थिक संकट आणि खराब व्यवस्थापनाने कारखान्याचे उत्पादन थांबवले. साखरेची एकूण विक्री गेल्या वर्षीच्या समान अवधीत विकल्या गेेलेल्या 66,000 टनाच्या तुलनेत 48,800 टन होती. राज्याचे स्वामित्व असणार्‍या अधिकांश कंपन्या पर्याप्त पूंजी, खराब मशीनरी, व्यवस्थापनाचा बोजवारा आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे निराशा जनक कामगिरी करत आहे. समीक्षा अवधीमध्ये, पाच सरकारी स्वामित्व असणार्‍या कंपन्यांपैकी केवळ तीनच चालू होत्या. खाजगी कारखान्यांनी चांगली कामगिरी करणे चालू ठेवले कारण त्यांनी कुशल व्यवस्थापनासह नवी मशिनरी आणली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here