ब्रासिलिया: गेल्या आठवड्यात इथेनॉल आणि ऊस उद्योगाला सहकार्य करण्याची घोषणा करुनही आतापर्यंत अर्थ मंत्रालयाकडून मदत मिळाली नसल्याचे सांगून ब्राझीलचे कृषी मंत्री तेरेज़ा क्रिस्टीना डायस यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, इंधनाच्या कमी किंमतीसाठी झगडणाऱ्या इथेनॉल सेक्टरला सहकार्य करण्याच्या उपायांमध्ये गैसोलीन वर CIDE टैक्स वाढवणे आणि इथेनॉल वर PIS / COFINS फ़ेडरल टैक्स हटवणे याचा समावेश आहे.
इथेनॉल च्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट सुरु आहे. यामुळे इथेनॉल निर्मात्यांच्या महसूला मध्ये खूप घट झाली आहे, आणि लॉक डाउन मुळे मागणी देखील जवळपास 50 % कमी झाली आहे. कारखान्यांनी आता आपला मोर्चा इथेनॉल उत्पादना ऐवजी साखरेकडे वळवला आहे. ज्यामुळे साखर उत्पादना साठी खूप जास्त ऊस वाटप करण्यात आले आहे. यामुळे साखरेच्या अंतरराष्ट्रीय किमतींवर दबाव पडेल. ते म्हणाले, उपायांना अर्थ मंत्रालयाच्या मंजूरीची प्रतिक्षा आहे. अर्थ मंत्रालय सोमवार पर्यंत निर्णय देईल, अशी आशा डायस यांनी व्यक्त केली.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.