साखर उद्योगाला सरकारकडून मदतीची आपेक्षा

औरंगाबाद : चीनी मंडी

कोरोना आणि त्यानंतरच्या लॉकडाउनमुळे यंदाच्या साखर गाळपामध्ये बाधा आली आहे, पूर्वीपासूनच संकटात असणार्‍या साखर उद्योगाला अधिक संकटात ढकलले आहे. लॉकडाउनमुळे आइस्क्रीम, थंड पेय निर्माते यांसारख्या औद्योगिक खरेदीदारांनी उत्पादनांच्या कमी विक्रीमुळे साखर खरेदीदारी बंद केली आहे. महाराष्ट्राची ग्रमीण अर्थव्यवस्था साखर उद्योगावर चालते. आणि कोरोनामुळे साखर उद्योगाबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे.

यामुळे सहकारी साखर कारखान्याच्या महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटीव शुगर फॅक्टरीज फेडरेेशन ने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला आहे. आणि या स्थितीतून बाहेर येण्यासाठी साखर उद्योगाला मदत करण्याी मागणी केली आहे.

फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले की, ऊसतोडणी, गाळप आणि साखर उत्पादन अधिक झाल्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनने कारखान्यांच्या गाळपामध्ये बाधा आली आहे. ज्यामुळे साखर कारखान्यांना मोठे नुकसान झाले आहे. दांडेगावकर आणि नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटीव शुगर फॅक्टरीज लिमिटेड चे उपाध्यक्ष केतनभाई सी पटेल यांनी पीएम नरेंद्र मोदी यांना वेगवेगळे पत्र लिहिले आहे.

पटेल यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे की, भारताच्या साखर उद्योगापासून जवळपास 5 करोड शेतकरी आणि जवळपास 10-15 लाख कामगार जोडले आहेत. येणार्‍या महिन्यांमध्ये गाळप सत्र सु़रु करण्यासाठी या कृषी उद्योगाला आपल्या पायावर उभं करण्यात सरकारचे सहकार्य आवश्यक आहे. लाखो ऊस शेतकर्‍यांना त्यांच्याकडून साखर कारखान्यांपर्यंत पोचवलेल्या ऊसाच्या बिलाची वाट पाहात आहेत. यामुळे केंद्र सरकारने शेतकर्‍यांना ही थकबाकी द्यावी, अशी मागणी कारखान्यांनी केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here