ब्रेसिला : कोरोना वायरस आणि लॉकडाउन मुळे आयुष्य अस्ताव्यस्त झाले आहे. लोक घरांमध्ये बंद आहेत. वाहतूक ठप्प आहे. घरांमध्ये केवळ कुकींग गॅसचा वापर होत आहेत. ब्राझील चे उर्जा मंत्री बेंटो अल्बुकर्क यांनी सांगितले की, त्यांच्या देशामध्ये गेल्या महिन्यात अर्थात एप्रिल महिन्यामध्ये इंधनाच्या वापरात जबरदस्त घट झाली. कुकिंग गॅसचा याला अपवाद होता. कुकिंग गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. इंधनाची मागणी घटल्यामुळे इथेनॉलवरही परिणाम झाला आहे. याच्या मागणीमध्ये एप्रिल महिन्यात 49 टक्के घट झाली आहे.
ब्राझील मद्ये डीजेलचा सर्वात अधिक वापर होतो. एप्रिल महिन्यामध्ये याच्या मागणीत 20 टक्के कमी झाली. तसेच गॅसोलीन मध्येही 35 टक्के घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
विमान केरोसिन च्या मागणीमध्ये 84 टक्के सर्वात मोठी घट दिसून आली आहे, तर एलपीजी आणि कुकिंग गॅसमध्ये ती 12 टक्के वाढली. ग्राहकांनी क्वारंटाइन पाहता याचा स्टॉक केला आहे. नॅचरल गॅसच्या मागणीत 33 टक्के कमी झाली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.