इतर देशातील कोरोनाचा वाढता फैलाव पाहता भारतात केंद्र सरकारने लॉकडाउनची घोषणा केली. या लॉकडाउनमुळे साखर कारखन्यातील ऊसतोड कामगार जिथे होते तिथे अडकून पडले होते. त्या कामगारांना राज्य शासन आणि साखर कारखान्यांनी योग्य नियोजन करुन तब्बल 1 लाख 31 हजार ऊसतोड कामगारांना त्यांच्या घरी सुखरुपरित्या पोचवले.
या कामगारांमध्ये एकट्या बीड जिल्ह्यात 51 हजार कामगार परतले आहेत. हे सर्व कामगार पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथील असून ते परतल्यानंतर त्यांना घरच्या घरी 14 दिवस क्वारंटाइन म्हणून राहावे लागले. या कामगारांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.
या कामगारांना त्यांच्या घरी परत जाण्यासाठी खास नियोजन करण्याची सूचना त्यांच्या विभागाला आणि अन्य शासकीय यंत्रणांना करण्यात आली. त्यांनतर कामगारांना त्यांच्या घरी पोचवण्याचा आराखडा तयार करण्यात आला. त्यानंतर कामगारांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. तसेच कामगार त्यांच्या जिल्ह्यात पोचल्यानंतर पुन्हा तिथे त्यांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.