सीतामढ़ी: कोरोना विषाणू साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, केंद्राच्या परिपत्रकांनुसार लॉकडाउन ठेवले, या लॉकडाऊनमुळे मोठ्या दिग्गज उद्योगांचे ताळेबंद खराब झाले आहेत .हि तूट भरून काढण्यासाठी बर्याच कंपन्या नोकर्यामध्ये कपात करत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार आता बिहारच्या रीगा शुगर मिलने 2 महिन्यांसाठी 600 कर्मचार्यांना काम न करता बाहेर काढले आहे. कारखाना प्रशासनाने रविवारी सायंकाळी उशिरा मुख्य गेटवर नोटीस बजावली. कारखाना व्यवस्थापनाच्या या निर्णयाने कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
साखर कारखान्याने 11 मे ते 11 जुलै या कालावधीत सर्व सेवांवर बंदी घातली आहे. कारखाना व्यवस्थापनाने सांगितले की, नियमानुसार ज्या साखर कारखान्यांचे 90 दिवस गाळप होत नाही, त्या साखर कारखानदारांना असे २ महिने काम थांबविणे भाग पडते. नोटीस वाचल्यानंतर सर्व कर्मचार्यांनी मुख्य गेटसमोर गोंधळ घातला . दरम्यान, रिगा मिल कामगार संघटनेचे सरचिटणीस मनोजकुमार सिंग, अध्यक्ष राम नंदन ठाकूर यांनी कारखान्याच्या या वृत्तीला कामगारांवरील मोठा अन्याय असल्याचे म्हटले.
साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनीही दावा केला आहे की कारखान्याने त्यांचे थकीत पैसे दिले नाहीत. परंतु साखर कारखान्याचे म्हणणे ,आहे की ते आर्थिक संकटाशी झगडत आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.