बिद्री (कोल्हापूर) : बिद्री साखर कारखान्याचा २०१९-२० हा गाळप हंगाम यशस्वी झाला असून, कारखान्याने राबवलेल्या सहवीज प्रकल्पातून आजपर्यंत 7 कोटी 97 लाख युनिट वीजनिर्मिती झाली. त्यामुळे कारखाना व प्रकल्पासाठी लागणारी वीज वजा करुन 5 कोटी 69 लाख 89 हजार युनिट विजेची विक्री करण्यात आली. ही वीज महावितरणला विक्री केली असून, 25 मे अखेर सहवीज ची वीज उत्पादन व विक्री सुरू राहणार आहे. त्याचबरोबर लॉक डाउन च्या काळातही एफआरपीप्रमाणे 2964 होणारी रक्कम 198 कोटी 85 लाख 41 हजार 137 रुपये ऊस उत्पादकांच्या बॅंक खात्यावर जमा केली असल्याचे बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, बिद्री साखर कारखान्या कडून 2019-20 या हंगामात गाळपास आलेल्या 6 लाख 67 हजार 524 टन ऊसाचे गाळप झाले. बिद्रीचा सरासरी साखर उतारा 12.85 टक्के असून 8 लाख लाख 57 हजार 800 साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांची देणी भागवता आल्याचेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ऊस तोडणी वाहतूक खर्चाचा विचार करता, ते पैसे वजा करुन कारखान्याने एफआरपीप्रमाणे प्रत्येक टनाला रुपये 2964 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. या हंगामात एफआरपीप्रमाणे 15 फेब्रुवारीअखेर पंधरा दिवसांची बिले मार्चपूर्वीच भागवली आहेत. लॉक डाउन दरम्यान 16 फेब्रुवारी ते हंगाम अखेरपर्यंतची बिलाची रक्कम रुपये 47 कोटी 88 लाख बाकी होती. त्यापैकी 16 कोटी 33 लाखाचे सोसायटी बिल खात्यावर जमा केले असून, उर्वरित 31 कोटी 55 लाख संबंधित ऊस पुरवठादारांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.”
याप्रसंगी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, गणपतराव फराकटे, प्रवीणसिंह पाटील, राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, श्रीपती पाटील, धोंडिराम मगदूम, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, प्रवीण भोसले, मधुकर देसाई, के. ना. पाटील, अशोक कांबळे, युवराज वारके, प्रदीप पाटील, जगदीश पाटील, नीताराणी सूर्यवंशी, सौ अर्चना पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.देसाई उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.