लॉकडाऊन च्या काळातील पगार कामगारांना द्यावा: नितीन पवार

पुणे: कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. यामुळे राज्यातील साखर कामगारांच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम झाला. त्यात कामावर ते जावू शकले नाहीत. त्यामुळे साखर कामगारांच्या ,लॉकडाउनच्या काळातील रजा पगारी सुट्टी गृहीत धरून त्यांना पगार देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार यांनी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील, कामगार राज्य मंत्री बच्चू कडू यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

पवार यांनी निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगार राज्य मंत्री बच्चू कडू, राज्याचे कामगार आयुक्त व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष,कार्यकारी संचालक यांनाही दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात पवार यांनी म्हटले आहे की, केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही कामगाराला कामावरून काढू नये, तसेच कोणाच्याही पगारात कपात करू नयेत, असे आदेश दिलेले आहेत. महाराष्ट्रात 245 साखर कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये दोन लाखांपेक्षा अधिक कामगार काम करीत आहेत. सरकारने कामगारांना लॉकडाऊनच्या काळात सुट्टी देऊन कारखाने बंद ठेवण्यास सांगितले. साखर कारखाना व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना सुट्या दिल्या. पण त्यांना संचित हक्काच्या, आजारी आणि किरकोळ रजा तसेच पुढील जुलै 2020 ते जून 2021 वर्षातील रजा देखील सक्तीने भरुन घेतल्या जात आहेत. या मनमानी कारभारामुळे कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

कामगारांना या परिस्थितीत दिलासा मिळावा यासाठी 22 मार्च ते 3 मे दरम्यान सक्तीने सुटीवर पाठविण्यात आलेल्या राज्यातील कामगारांना लॉक डाउन चा काळ हा पगारी सुटी गृहीत धरून पगार देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here