लखनऊ: सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेश मध्ये मागणी कमी झाल्यामुळे साखरेच्या दरात घट झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान साखरेची विक्री ठप्प झाली आहे.
हॉटेल्स, मिठाईची दुकाने बंद असल्यामुळे साखरेच्या मागणीत घट झाली आहे. UPSMA यांच्या मतानुसार, साखरेच्या कमी मागणीमुळे कारखानदारांसमोर ऊस शेतकऱ्यांची थकबाकी भागवणे हे एक आव्हान उभे आहे. कारण ऊसाची बाकी आता 14,000 करोड़ वर पोचली आहे.
UPSMA चे अध्यक्ष सीबी पाटोदिया यांनी सांगितले की, कारखान्यांना ऊस शेतकऱ्यांची देणी भागवणे अवघड झाले आहे. यासाठी साखर कारखाने दिलासा पेकेज ची मागणी करत आहेत. होळीनंतर साखर विक्री वाढण्याचा अंदाज होता. कारण उन्हाळ्यात पेय पदार्थ आणि आईसक्रिम बनवण्यासाठी साखरेला मागणी असते. पण कोरोना महामारीने सारच काही उध्वस्त केल आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण 119 साखर कारखाने आहेत. यापैकी 30 एप्रिल पर्यंत 44 कारखान्यांनी गाळप संपवले आहे. तर 75 कारखान्यात अजूनही गाळप सुरु आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.