नेस्‍को कोरोना काळजी केंद्राची मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गोरेगाव येथील नेस्‍को मैदानावर उभारण्यात येत असलेल्या कोरोना काळजी केंद्र २ (CCC 2) व्यवस्थेची काल (दिनांक १५ मे २०२०) सकाळी पाहणी केली.

राज्‍याचे उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा मंत्री श्री. सुभाष देसाई, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल, सहआयुक्त (विशेष) श्री. आनंद वागराळकर, पी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. देवीदास क्षीरसागर, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) श्री. विजय पाचपांडे, विशेष कार्य अधिकारी श्री. देवेंद्र जैन तसेच श्री. मिलिंद नार्वेकर हे यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री आणि मान्यवरांनी नेस्‍को मैदानावर सभागृह क्रमांक २ व ३ या ठिकाणी करण्‍यात आलेल्‍या व्‍यवस्‍थेची प्रामुख्‍याने पाहणी केली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. जयस्वाल यांनी मुख्यमंत्री महोदयांना नेस्को केंद्रावर करण्यात येत असलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली. एकूण १,२४० बेड क्षमता असलेले हे संपूर्ण केंद्र असणार आहे. याठिकाणी ऑक्सिजन पुरवठादेखील उपलब्ध असेल. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि स्नानगृहे, गिझर यासह प्रत्येक बेडला स्वतंत्र पंखा दिले जाणार आहेत. पुरेसे वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका नेमण्यात येणार आहेत. संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या तयारीबाबत समाधान व्यक्त केले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here