लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मार्गदर्शन व मंत्री, साखर उद्योग व ऊस विकास सुरेश राणा यांच्या कुशल नेतृत्वामध्ये साखर उद्योग व ऊस विकास विभागाकडून कोरोना महामारी च्या देशव्यापी भिती दरम्यान विषम परिस्थिती असूनही ऊस शेतकर्यांच्या हितासाठी अविरतपणे काम सुरु आहे. तसेच ऊस शेतकर्यांच्या शेतात उभ्या असणार्या ऊसाचा साखर कारखान्यांना पुरवठा करण्याचेही निश्चित केले जात आहे.
या संदर्भात विस्तृत माहिती देताना प्रदेशाचे ऊस आयुक्त संजय आर. भूसरेड्डी यांनी सांगितले की, ऊस विकास विभागाकडून लॉकडाउनच्या कालावधीत ऊस शेतकर्यांचे हित जपण्यासाठी साखर कारखाने सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जेणेकरुन लॉकडाउन दरम्यान प्रदेश व देशाच्या दुसर्या भागातून पुरवण्यात येणारे आवश्यक कच्च्या साहित्याची उपलब्धता देखील संबंधीत अधिकार्यांकडून समन्वय करुन निश्चित करण्यात आली, ज्यामुळे साखर कारखान्याच्या गाळपावर परिणाम होवू नये.
भूसरेड्डी म्हणाले की, प्रदेशातील 46.2 लाख ऊस पुरवठाकर्त्या शेतकर्यांना गाळप हंगाम 2019-20 मध्ये आतापर्यंत 6.13 करोड ऊसाच्या पावत्या सुरु करण्यात आल्या आहेत. तर गेल्या वर्षात सामान्य परिस्थतीमध्ये देखील या वेळेपर्यंत 5.5 करोड ऊस पावत्या देण्यात आल्या होत्या, ज्यामुळे प्रदेशातील साखर कारखान्यांकडून आतापर्यंत 10,715.40 लाख क्विंटल ऊसाचे गाळप करुन 1216.8 लाख क्विंटल साखर उत्पादित करण्यात आली आहे. तर गेल्यावर्षी या वेळेपर्यंत 10,118.77 लाख क्विंटल ऊस गाळप केले होते, तथा साखर उत्पादन 1163.69 लाख क्विंटल होते. सध्याच्या गाळप हंगामात एकूण 119 साखर कारखान्यांकडून गाळप कार्य सुरु केले होते आणि 66 कारखान्यांनी गाळप समाप्त केल्यानंतर आताही 53 साखर कारखान्यांचे गाळप सुरु आहे. तर गेल्या वर्षी या वेळेपर्यंत केवळ 30 साखर कारखान्यांचे काम सुरु होते आणि 89 साखर कारखान्यांनी गाळप कार्य बंद केले होते.
प्रदेशातील ऊस गाळप व साखर उत्पादनाचे परिक्षेत्रवार आकड्यांनी हे स्पष्ट केले आहे की, केवळ प्रदेश स्तरावर ऊस गाळप गेल्या वर्षी च्या पेक्ष अधिक राहिले आहे. जे विभागीय कारणांमुळे शेतकर्यांना ऊस पुरवठा व्यवस्थेमध्ये सुगमतेला प्रदर्शित करते. तर विभागाकडून प्रत्येक स्तरावर नियमित परीक्षण करुन हे निश्चित केले जात आहे की, ऊस शेतकर्यांना ऊस पुरवठ्यामध्ये कोणतीही आडचण होवू नये आणि साखर कारखाने समस्त गाळपासाठी ऊसाच्या गाळपानंतरच बंद व्हावेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.