साओ पौलो : ब्राझीलमध्ये इथेनॉल उद्योगावर गंभीर परिणाम झाला आहे. ज्यामुळे ऊस शेतकरी अडचणीत आले आहेत. कोरोना महामारी च्या संकटादरम्यान, साओ पाओलो येथील ग्रामीण भागामध्ये सोयाबीन, मका आणि भुईमुग मुळे ऊसाचे क्षेत्र कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती घसरल्यामुळे आणि कोविड 19 महामारी संकटामध्ये साखरेची मागणी आणि किमतीत घट झाल्यानंतर शेतकर्यांचा ऊस पीकातील उत्साह कमी होत आहे.
शेतकरी फर्नांडो एसकारौपा यांनी 535 हेक्टर चे आपले ऊस क्षेत्र कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्यांनी सोयाबीन ची पेरणी वाढवली आहे. साओ पाउलो राज्यातील उत्तर मध्ये राहणारे शेतकरी उसेलेई कैवातो देखील या क्षेत्रात कित्येक साखर कारखाने आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे पाहून ऊस पीक कमी करत आहेत. जर इथेनॉल ला चांगली मागणी नसेल आणि हीच स्थिती कोरोना नंतरही राहिली, तर अनेक उत्पादकांना ऊसाचे पीक कमी करावे लागू शकते
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.