कोल्हापूर ,दि. 24 ऑगस्ट 2018: राज्यातील ऊस तोड मजुरांचे तब्बल 200 कोटी अधिक मजुरी साखर कारखान्यांकडे थकीत आहे. हातावरचे पोट असणाऱ्या मजुरांना त्यांची हक्काची मजुरी न मिळाल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाले आहे.
साखर कारखाने ऊसाची एफ आर पी 14 दिवसाच्या द्यावी असा कायदा आहे.त्या कायद्याला बांधील राहून साखर कारखाने शेतकऱ्यांना काही ना काही प्रमाणात या एफ आर पी ची रक्कम देत आहेत. मात्र ऊसतोड मजुरांची मजुरी मात्र बहुसंख्य साखर कारखान्याने थकवली आहे. त्यामुळे पुढील वर्षी हे मजूर संबंधित कारखान्याकडे ऊसतोड मजूर म्हणून काम करतील किंवा नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
राज्यात सहन समजले जाणाऱ्या कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यातही कारखान्याने ऊसतोड मजुरांची मजुरी थकित ठेवली आहे. साखर कारखान्यांनी याची दखल घेऊन ऊसतोड मजुरांची मजुरी तत्काळ दिली पाहिजे अशी मागणी केली जात आहे. शेतकरी विविध मार्गाने शासनाकडे आपली थकित रक्कम मागणी करत आहेत. मात्र ऊसतोड मजूर असंघटित असल्याने मागणी कोणाकडे करायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. साखर कारखान्यांनी वेळेत त्यांची मजुरी न दिल्यास भविष्यात मात्र या साखर कारखान्याच्या ऊस तोडी वरती याचा परिणाम होणार हे नक्की आहे.
राज्यात सुमारे दोनशे कोटीहून अधिक रुपयांची ऊसतोड मजूर देणे अद्यापही शिल्लक आहे. कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे सव्वाशे कोटी रुपये द्यावे लागणार आहे. मात्र ही रक्कम मिळाली किंवा नाही याचे कोणालाही सोयरसुतक नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.