झाशी : उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातींल बाहेरच्या परिसरामध्ये शनिवारी संध्याकाळी टोळधाडचा एक झुंड दिसला . यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. झाशी जिल्हा प्रशासनाने टोळधाड पाहिल्यानंतर फायर ब्रिगेड ला केमिकलसह तयार राहण्यास सांगितले आहे.
या संदर्भात आणीबाणी बैठकीत अध्यक्षस्थानी असणार्या जिल्हा मॅजिस्ट्रेट यांनी सांगितले की, सामान्य लोकांबरोबर ग्रामीण लोकांनाही सांगण्यात आले आहे की, त्यांनी टोळांबाबत नियंत्रण कक्षाला सावध करावे. टोळ तिथेच जातील जिथे हिरवे गवत आणि हिरवळ आहे.
टोळांचे फिरणे सुरु आहे. टोळांच्या जवळपास 2.5 ते 3 किलोमीटर लांब असणार्या झुंडीने देशात प्रवेश केला आहे. टोळांपासून निपटण्यासाठी राजस्थानातील कोटा येथून एक पथक आले आहे.
टोळधाड हा पाकिस्तानातून आलेला कीटक आहे, त्यांचा एक मोठा झुंड जो 15 ते 20 दिवसांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणा तून झाशी येथे येवून पोचला आहे.