नवी दिल्ली : चीनी मंडी (24 Aug)
भारतात उत्सवांचा काळ असूनही साखर उद्योग प्रचंड मंदीतून जात आहे. गेल्या आठवड्याभरापासून देशभरात साखरीची विक्री घटली आहे. श्रावण महिना असूनही तोंडावर आलेला गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणिदिवाळी या काळातही साखरेला बाजारपेठेत उठाव नसल्याचे दिसत आहे.
दरम्यान केंद्र सरकराने ऑगस्ट महिन्यासाठी १७.५ लाख टन साखर विक्रीचे उद्दीष्ट्य ठरविले आहे. साखर कारखानदारांना मात्र, साखरेच्या विक्रीचे हे लक्ष्य पूर्ण होईल की नाही या विषयी भीती वाटत आहे. मान्सूनआणि अतिरिक्त उत्पादनामुळे आधीपासूनच साखरेच्या बाजारपेठेत मंदी आहे. त्यातच वाहतूकदारांच्या संपाने यात भर टाकली आहे.
केंद्र सरकार येत्या सप्टेंबर महिन्यात साखरेची विक्री व्यवस्थित व्हावी, यासाठी योग्य धोरण ठरवेल, अशी अपेक्षा साखर उद्योगातील तज्ज्ञांना आहे.