लखीमपूर : कोरोना पासून वाचण्यासाठी शासन अनेक स्तरावर प्रयत्न करत आहे. या अंतर्गत मंत्री साखर उद्योग तसेच ऊस विकास सुरेश राणा यांनी प्रदेशातील सर्व ऊस परिक्षेत्रांमध्ये सॅनिटायझेशन करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांतर्गत जिल्हा ऊस विभागही इथे सॅनिटायझेशन करत आहे.
जिल्हा ऊस अधिकारी बृजेश पटेल यांनी सांगितले की, जिल्हयातील 09 साखर कारखान्यांच्या माध्यमातून त्यांच्या जवळच्या सर्व सार्वजनिक कार्यालये, रुग्णालय, सीएचसी, पीएचसी, तहसील, गांव, ब्लॉक आणि साखर कारखाना गेट तसेच सर्व खरेदी केंद्रांवर सॅनिटायझेशन केले जात आहे.
अभियानामध्ये शेतकऱ्यांना कोरोनापासून वाचण्याचे उपाय सांगितले जात आहेत. ऊस विकास विभागाकडून साखर कारखान्यांंच्या सहयोगाने लखीम पूर क्षेत्रामध्ये आतापर्यंत 276 गांवे, 12 गल्ल्या व 342 सार्वजानिक कार्यालयांचे सॅनिटाइजेशन झाले आहे. जिल्हा ऊस अधिकाऱ्यानि सांगितले की, सॅनिटाइजेशन कार्यात असणाऱ्या ऊस विकास विभाग तसेच कारखाना कर्मचाऱ्यांकडून सामाजिक अंतराचेही ध्यान ठेवले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.