कराची: सिंध चे सूचना मंत्री सैयद नासिर हुसैन शाह यांनी सांगितले की, पंतप्रधान इमरान खान यांनी गठित केलेल्या साखर तपासणी आयोगाचा उद्देश्य आहे कि, साखरेच्या किमती कशा वाढल्या. मंत्री शाह यांनी सांगितले की, पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ च्या नेत्यांकडून चोर म्हणून सातत्याने आरोप केल्या गेलेल्या लोकांच्या वेळी साखरेच्या किंमती 50 ते 53 रुपयाच्या आसपास होत्या. तर पीटीआई सरकारच्या वेळी किंमत 80 पेक्षा अधिक झाली.
सैयद नासिर हुसैन शाह यांनी सांगितले की, साखर तपासणी आयोगाच्या अहवालानुसार, साखरेच्या किमतीत अचानक वृध्दीमुळे निर्यातीची परवानगी देण्यात आली. त्यांनी सांगितले, जवळपास 10 लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. ज्यामुळे देशातील साखरेची किंमत वाढली. त्याच साखर आयोगाच्या अहवालात म्हटले आहे की, साखर निर्यात करण्याची परवानगी पंतप्रधान इमरान खान यांनी दिली होती. प्रांतीय सूचना मंत्री शाह म्हणाले, लोकांना हे माहिती पाहिजे की त्यांचे पंतप्रधान इमरान खान यांच्याकडे प्रभारी वाणिज्य मंत्री यांचा पोर्टफोलियो देखील होता. अब्दुल रज्जाक दाऊद केवळ पंतप्रधान यांचे विशेष सहायक होते. सैयद नासिर हुसैन शाह यांनी सांगितले की, पंतप्रधान यांच्या परवागीनेच साखर निर्यात करण्यात आली होती त्यानंतर देशात साखरेची कमी झाली आणि परिणाम स्वरुप साखरेच्या किमती वाढल्या. त्यांनी सांगितले की, सिंधचे मुख्यमंत्री सैयद मुराद अली शाह यांना बोलवणे आणि त्यांना तपासणीत सामिल करणे हा एकच उद्देश जनतेला आकर्षित करण्याचा होता. त्यांनी सांगितले की, पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआई) नेत्यांची ही नेहमीची सवय आहे की, जेव्हा देखील त्यांना आपला पक्ष राखण्यासाठी सांगितले जाते, तेव्हा ते दुसऱ्यांना दोष देवून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करतात.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.