बागपत : सहकारी साखर कारखाना रमाला बागपत च्या वर्ष 2019 -20 गाळप हंगाामाच समारोप झाला. कारखान्याने 83,04,862 क्विंटल ऊस गाळप केले आणि 8,90,600 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. रमाला सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम 2019- 20 ची सुरुवात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 4 नोव्हेंबर 2019 ला झाली होती.
गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरला शुभारंभ झाल्यानंतर गाळप सुरु झाले नव्हते. यानंतर शेतकऱ्यांनी रमाला कारखाना परिसरात अनेक वेळा धरणे आंदोलन केले. तरीही कधी कारखान्याची चेन तुटत होती , तर कधी टरबाइन बंद होत होती, कधी व्यवस्थापन समिती आणि मिल अधिकाऱ्यांमध्ये वाद होत होते, कधी कर्मचारी कारखाना बंद करत होते.
तरीही मुख्य प्रशासक डॉ .आर.बी राम यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्य 68,00,000 लाख क्विंटल मागील रेकॉर्ड मागे सोडून कार्य दिवसात कारखान्या ने 83,04,862 लाख क्विंटल ऊस गाळप केले आणि 8,90,600 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. बुधवारी सकाळी 6 वाजता कारखान्याच्या गाळप हंगामाचा समारोप झाला. यानंतर सर्व कर्मचाऱ्यांंनी एकत्र येऊन व्यवस्थापक डा. आर.बी राम यांचे अभिनंदन केले. यावेळीउप प्रशासक जी.के पोद्दार, मुख्य ऊस अधिकारी उदय भान सिंह, उत्तम ग्रुप चे साइड मॅनेजरअश्वनी तोमर, सुमित पंवार, विकास तोमर, बालेश्वर सिंह ,तेजबीर सिंह, सुशील कुमार आदि कर्मचारी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.