चिनी मंडी, कोल्हापूर: बी-मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती फायदेशीर असल्यामुळे येणाऱ्या हंगामात साखर कारखाने मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मितीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी इथेनॉलचे दर कायमस्वरूपी किफायतशीर राहतील याची हमी सरकारने द्यावी, अशी कारखान्यांकडून मागणी होत आहे.
केंद्र सरकारने नव्या धोरणात उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीस परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे सी-मोलॅसिस आणि बी-मोलॅसिसचे दर देखील ठरवून दिलेले आहेत. त्यानुसार बी-मोलॅसिसला प्रतिलिटर ४७ रुपये ४९ पैसे, तर सी-मोलॅसिसला ४३रुपये ७० पैसे असा दर मिळणार आहे. देशात यंदाच्या हंगामात साखरेचे उत्पादन ३२० लाख टनांवर गेले आहे. देशाला गरज आहे २५० टन साखरेची. शिल्लक साखर पाहता हंगामाच्या सुरुवातीला अजूनही सुमारे १०० लाख टन साखर शिल्लक आहे. तसेच जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर घसरलेले असल्याने साखर निर्यातीवरही मर्यादा आल्या आहेत. शिवाय ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढल्याने यंदा साखरेचे उत्पादन ३५० लाख टनांवर जाईल असा अंदाज ‘इस्मा’ने वर्तवलेला आहे. म्हणून सरकारचे उसापासून थेट इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे. या धोरणामध्ये नव्या थेनॉल प्रकल्पासाठी पाच वर्षे बिनव्याजी कर्ज आणि इतर सवलतींचादेखील समावेश आहे.
ज्या कारखान्यांच्या सध्या डिस्टिलरी आहेत त्यांना नव्या धोरणानुसार सवलती मिळणार नाहीत परंतु इथेनॉल निर्मितीकडे लगेच वळता येणार आहे. नव्या प्रकल्पात इन्सिरेशन बॉयलर उभारावयाचा असल्याने प्रदूषणाचा प्रश्नदेखील निर्माण होणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ज्ञ
साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो २९ रुपये गृहीत धरून सध्याचा इथेनॉलचा दर आहे. येणाऱ्या हंगामात किमान विक्री दर ३६ रुपये प्रतिकिलो मिळावा, अशी मागणी इस्माने केली आहे. ती गृहीत धरता इथेनॉलला ५५ रुपये प्रतिकिलो दर मिळावा यासाठीदेखील कारखानदारांचा पाठपुरावा सुरु आहे. इथेनॉल निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाल्याने साखर उद्योगावरचे संकट कमी होण्यास मदत होईल.
मोलॅसिस चे गणित
एक टन सी-मोलॅसिसपासून सुमारे २५० ते २७५ लिटर इथेनॉल निर्मिती होते. तर बी-मोलॅसिसपासून ३१० ते ३३५ लिटरपर्यंत इथेनॉलनिर्मिती होऊ शकते. उसाचे १०० टन गाळप झाल्यानंतर ४ टन सी मोलॅसिस निघते. तर बी मोलॅसिसप ७ टन इतके निघते. सी च्या तुलनेत बी-मोलॅसिसीपासून अधिक प्रमाणात साखर निघते. त्यामुळे उताऱ्यात एक ते दीड टक्का घेत येऊ शकते.